रुमडामळ (मडगाव-गोवा) येथील अनधिकृत मदरसा त्वरित बंद करा ! – ग्रामसभेत ग्रामस्थांची पुन्हा मागणी
मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये चालत असल्याची ग्रामस्थांची तक्रार
मडगाव, २८ मे (वार्ता.) – रुमडामळ येथील मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये होत असल्याने हा मदरसा त्वरित बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी रुमडामळ पंचायतीच्या २८ मे या दिवशी झालेल्या ग्रामसभेत केली. या अनधिकृत मदरशामुळे त्रास होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वीही पंचायतीकडे केली होती; मात्र या विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत पुन्हा ही मागणी केली. ग्रामसभेत एका पंचसदस्याने हा मदरसा बंद न झाल्यास तेथे डुक्कर आणून टाकणार, असे विधान केल्याने या वेळी नवीन वाद निर्माण झाला.
Rumdamol Panchayat: रुमडामळ येथील मदरशाला स्थानिकांचा विरोध कायम; पंच सदस्याच्या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरुवातhttps://t.co/AIswLaLhE1
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) May 28, 2023
मदरशाच्या व्यवस्थापनाच्या मते मदरसा एक ट्रस्ट चालवतो आणि ट्रस्ट सामाजिक कार्य करत आहे. मदरशामध्ये मुलांना इंग्रजी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये शिकवले जाते. मदरशाला पूर्वीच्या पंचायत मंडळाने मान्यता दिलेली आहे आणि यामुळे लोकांना लाभ होत असल्याने येथे एका मंत्र्यानेही भेट दिलेली आहे. रुमडामळ पंचायतीने हे प्रकरण सध्या गटविकास अधिकार्यांकडे सुपुर्द करण्यात आल्याचे सांगितले.
(सौजन्य : Prudent Media Goa)
संपादकीय भूमिकादेशभरातील मदरशांमध्ये कोणते शिक्षण दिले जाते ? याविषयी देशवासियांना शंकाच आहे. उत्तरप्रदेश, आसाम आदी राज्यांतील अनेक अवैध मदरसे तेथील सरकारांनी बंद पाडले आहेत. असे असतांना गोव्यातील एका मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये चालत असल्याची ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्यांची चौकशी का केली जात नाही ? ग्रामस्थांना मदरसा बंद करण्याची मागणी पुन:पुन्हा का करावी लागते ? |