विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !
कोल्हापूर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सांगली
१. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सभागृह नेत्या सौ. भारती दिगडे आणि भूषण अग्रदूत दीपक चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी कमलाकर कुलकर्णी, श्रीपाद बासुदकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
२. भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यविरांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले.’’ या प्रसंगी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, श्रीकांततात्या शिंदे, नगरसेवक संजय कुलकर्णी, सुबराव मद्रासी, डॉ. भालचंद्र साठे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
३. ‘चित्पावन परिवार सांगली’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. वामन बर्वे, सर्वश्री चंद्रकांत पाटणकर, श्री. शरद फडके, विनायक मुन्नूर, मधुकर मोडक, गजानन पटवर्धन, सौ. नेत्रा खाडिलकर यांसह अन्य उपस्थित होते.
४. सांगली येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. हरि पाटणकर यांच्या घरी ‘श्रीगणेश ज्येष्ठ नागरिक संघा’चे अध्यक्ष श्री. दत्ताजीराव कुलकर्णी आणि श्री. रामभाऊ रिसवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी सौ. रोमा अंबेकर, सौ. श्रद्धा पाटील, कु. मधुरा पाटणकर यांसह अन्य उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा
१. अखिल भारतीय हिंदू महासभा आणि वि.दा. सावरकर बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी स्वातंत्र्यविरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. जयवंत निर्मळ, सर्वश्री संजय कुलकर्णी, मालोजी केरकर, राजेंद्र शिंदे, सौ. श्रुती चरणकर यांसह अन्य उपस्थित होते.
२. २७ मे या दिवशी पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार श्री. विश्वासबुवा कुलकर्णी यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर.. बहुगुणी सावरकर’यावर ‘मंगलधाम’, ब्राह्मणसभा करवीर येथे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. श्री. विश्वासबुवा कुलकर्णी यांनी कीर्तनद्वारे स्वातंत्र्यविरांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखवले. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर साहित्य आणि विज्ञान मंडळाचे श्री. नितीन वाडीकर यांसह ब्राह्मणसभा करवीरचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मिरज येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना !
मिरज – मिरज येथे झालेल्या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली, तसेच आमदार डॉ. खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातही स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री श्री. मकरंद देशपांडे, प्रा. मोहन व्हनखंडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी उपस्थित होते.