(म्हणे) ‘आपण पुन्हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार
खासदार शरद पवार यांची नव्या संसद भवनाच्या उद़्घाटन सोहळ्यावर टीका !
मुंबई – आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरू यांनी मांडली; पण ‘आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षे मागे घेऊन जातो कि काय ?’, अशी चिंता वाटते. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारित समाज निर्माण करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे (देहलीत) जे चालले आहे, ते याच्या एकदम उलट आहे, असे विधान नव्या संसद भवनाच्या उद़्घाटन सोहळ्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी मांडले.
(स्त्रोत : NDTV)
संपादकीय भूमिकासंसद भवनाच्या स्थळी हिंदु धर्मानुसार शास्त्रोक्त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्यामुळे ते आता विज्ञानवादाच्या गप्पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत ! |