ज्ञानवापीच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे प्रशासन आणि न्याययंत्रणा यांना स्वतःला का कळत नाही ?
‘वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी चालू असलेल्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात एकत्रपणे करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी २३ मे २०२३ या दिवशी हा आदेश दिला. या प्रकरणी एकूण ७ खटले चालू आहेत. या प्रकरणी एकत्रित सुनावणी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.’ (२४.५.२०२३)