१३ वर्षे बेपत्ता असलेल्या सैनिकाला शोधू न शकणे, हे सरकारला लज्जास्पद !
‘सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला आमच्याकडे सोपवावे’, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.’ (२६.५.२०२३)