संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबई – देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली. हा वाद झाला नसता, तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’द्वारे व्यक्त केली.
आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे.
ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं.
असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं…— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2023
या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचे प्रतीक आहे, ती लोकशाही टिकवण्यासाठी झटलेल्या सर्वांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.