‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही’, म्हणणार्या कलाकार जरना गर्ग यांनी ‘तुम्ही काय पाप केले; म्हणून तुमची उंची कमी झाली ?’, याचा विचार करावा !
‘मी आणि माझे पती बुटके आहोत. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, आमचा मुलगा उंच व्हावा; परंतु हिंदूंमध्ये उंची वाढणारा एकही देव नाही. हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे’, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) येथे केले.’ (२३.५.२०२३)