पुण्यात ‘तिहेरी तलाक’ प्रकरणी अकीबला अटक आणि जामीन !
पुणे – विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ‘तिहेरी तलाक’ (घटस्फोट) दिल्या प्रकरणी अकीब मुल्ला याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी नंतर जामीन संमत केला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय विवाहितेने तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘तिहेरी तलाक’च्या प्रकरणी पतीला अटक झाल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पतीसह सासू, सासरा, नणंद आणि नणंदेचा पती यांच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराने तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेवर संशय घेऊन तिचा शारिरीक, मानसिक छळ केला. पतीने ३ वेळा ‘तलाक’ म्हणत नांदवण्यास नकार दिला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास नणंदेच्या पतीने जिवे मारण्याची धमकी दिली.