धरणात पडलेला स्वतःचा भ्रमणभाष संच शोधण्यासाठी लाखो लिटर पाणी उपसणारा अन्न निरीक्षक निलंबित !
कांकेर (छत्तीसगड) – येथील अन्न निरीक्षक राजेश विश्वास यांचा १ लाख रुपयांचा भ्रमणभाष संच येथील खेरकट्टा-परलकोट धरणात पडल्यानंतर तो शोधण्यासाठी ४ दिवस पंप लावून पाणी उपसण्यात आले. त्यानंतर हा संच सापडला. हे धरण १५ फूट खोल आहे. त्यातील १० फुटांपर्यंत पाणी उपसण्यात आले. उपसण्यात आलेल्या पाण्यातून शेकडो एकर शेतीचे सिंचन होऊ शकले असते. या संदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर राजेश विश्वास यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सौजन्य द इंडियन एक्सप्रेस
संपादकीय भूमिकाअशांना निलंबित नाही, तर अटक करून अनेक दिवस पाण्याविना रहाण्याचीच शिक्षा केली पाहिजे ! |