मी बंगालमध्ये गेलोे, तर मला अटक करण्यात येईल !
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी व्यक्त केली भीती !
मुंबई – बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचे सहनिर्माते आणि दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या चित्रपटात घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना सरकारकडून सर्वप्रकारचे साहाय्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी ३० मे पर्यंत मिश्रा यांना पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित रहाण्याची नोटीस बजावली आहे. यावर सनोज मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले, ‘मी जर बंगालमध्ये गेलो, तर तेथून परत येऊ शकणार नाही. मला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल. मी एखादा गुन्हेगार किंवा आतंकवादी आहे, अशा कलमांखाली मला फसवले जाईल.’
‘I am being implicated, once I go to Bengal, I won’t return’: ‘The Diary of West Bengal’ director summoned for questioning by the West Bengal policehttps://t.co/llBTdjRJn6
— OpIndia.com (@OpIndia_com) May 27, 2023
मिश्रा म्हणाले की, मी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करतो. बंगालमध्ये हत्या, बलात्कार आणि हिंदूंच्या पलायनाच्या घटना वाढत आहेत. मी पूर्ण संशोधन केले आहे. संपूर्ण चित्रपट सत्य माहितीवर आधारित आहे. येत्या ऑगस्टमध्ये आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत.
संपादकीय भूमिका
|