नवी मुंबईत ३० मे या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही !
नवी मुंबई – येथे मुख्य जलवाहिनीवरील मान्सूनपूर्व पाणीपुरवठ्याच्या संबंधी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० मे या दिवशी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मान्सूनपूर्व कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. ३१ मे या दिवशी सकाळी पाणीपुरवठा अल्प दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा.