मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान !
मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !
तक्रारींकडे कानाडोळा करणार्या पोलिसांच्या कारभाराविषयी खेद व्यक्त !
मुंबई – मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर पोलिसांकडून कारवाई न होणे, हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने २६ मे या दिवशी पोलिसांना फटकारले. या तक्रारींकडे कानाडोळा करणार्या पोलिसांच्या कारभाराविषयीही न्यायालयाने खेद व्यक्त केला. न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपिठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
कांदिवलीच्या मशिदीवरील लाऊड स्पीकरमुळे ध्वनीप्रदूषण
रहिवाशी रीना रिचर्ड यांची मुंबई हायकोर्टात याचिका
मशिदीवरील लाऊड स्पीकरवर कारवाई न करणे न्यायालयाचा अपमान
हायकोर्टाने फटकारले
झोन-१२ पोलीस उपायुक्तांना कोर्टाचे निर्देश
सुप्रीमकोर्ट निर्देशाचे पालन करण्याचे हायकोर्टाचे आदेश— Ravindra Anaspure (@ravindranaspure) May 26, 2023
कांदिवली (पूर्व) येथील ठाकूरगाव परिसरातील मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाविषयी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या पोलिसांविरुद्ध अधिवक्ता रीना रिचर्ड यांनी केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गेल्या मासात नोंद घेतली होती. रात्रीच्या वेळी ध्वनीक्षेपकांचा वापर केला जाणार नाही, हे पहाण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता. ‘याविषयीच्या कायद्याचे पालन न केल्यास अवमानाची कारवाई करू’, अशी चेतावणी न्यायालयाने पोलिसांना दिली होती.
Bombay High Court reprimands Mumbai Police for not taking action against noise pollution caused by loudspeakers installed in Mosques, even after receiving complaints. “Failure to act on noise pollution from mosques amounts to contempt of court”, says the Bombay High Court
Court…
— ANI (@ANI) May 26, 2023
याचिकाकर्तीने केलेल्या तक्रारींवर कारवाई करण्याविषयीही न्यायालयाने बजावले होते. या आदेशांनंतर दोन वेळा तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई केली गेली नाही. त्यामुळे याचिकाकर्तीने पुन्हा एकदा सुट्टीकालीन न्यायालयात धाव घेऊन पोलिसांची निष्क्रियता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.