कर्नाटकात मुसलमान मैत्रिणीसमवेत नाश्ता केल्याच्या कारणावरून हिंदु तरुणाला मारहाण
मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला आरोपी मुसलमान तरुणांची क्षमा मागण्यास भाग पाडले !
चिक्काबल्लापूर (कर्नाटक) – अलीकडच्या काळात हिंदु तरुण मुसलमान मुलींसमवेत दिसताच त्यांना मुसलमान गटांकडून लक्ष्य केले जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकतेच कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे मुसलमान मैत्रिणीसमवेत नाश्ता केल्याच्या कारणावरून हिंदु तरुणाला मुसलमानांच्या गटाने बेदम मारहाण केली. याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलीस आरोपी मुसलमानांचा शोध घेत आहेत.
Karnataka: Hindu Youth Eating Snacks With Muslim Woman Beaten in Chikkaballapur#Karnataka #Chikkaballapurhttps://t.co/iFjvx4wXTE
— TIMES NOW (@TimesNow) May 26, 2023
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मुसलमान तरुणी तिच्या एका हिंदु मित्रासमवेत नाश्ता करण्यासाठी ‘गोपिका चाटर’ नावाच्या ‘फूड स्टॉल’वर गेली होती. येथे मुसलमान तरुणांच्या एका गटाचे त्या दोघांकडे लक्ष गेले. मुलगा हिंदु असल्याचे कळताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मुलीच्या कुटुंबियांनी तिला त्या आरोपी मुसलमान तरुणांची क्षमा मागण्यास भाग पाडले.
अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. २१ मे २०२३ या दिवशी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे एका मुसलमान मुलीला हिंदु मुलासमवेत बाजारात खरेदी करतांना पाहून मुसलमान तरुणांच्या एका गटाने हिंदु मुलाला बेदम मारहाण केली होती. नुकतेच बिजनौरमध्ये पोलिसांनी अशाच एका प्रकरणात हिंदु तरुणाला मारहाण केल्याच्या कारणावरून ४ मुसलमान तरुणांना अटक केली होती.
Karnataka: A group of Muslim men allegedly harass a woman for an outing with a male friend from the Hindu community in Chikkaballapur
“The woman confronted them & even approached the police but was later forced by her family to issue an apology,” @NehaHebbs reports. pic.twitter.com/kTlXZnssmZ
— TIMES NOW (@TimesNow) May 26, 2023
संपादकीय भूमिकामुसलमान तरुणांच्या या कृतीवर त्यांचे अन्य मुसलमान धर्मबांधव कधी आक्षेप घेऊन त्यांचा निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! उलट असे हिंदूंनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या संदर्भात केले असते, तर पुरोगाम्यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते ! आता तेही गप्प आहेत ! |