गोवा : ५० वर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर वन खाते यंदा सर्वसमावेशक वन व्यवस्थापन योजना सिद्ध करणार
पणजी – वनक्षेत्र व्यवस्थापनाकडे गेली ५० वर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर वन खाते यंदा सर्वसमावेशक वन व्यवस्थापन योजना सिद्ध करणार आहे. वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ही योजना १२ मासांत सिद्ध करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
Charting a Sustainable Future for the state of Goa.
During my recent interaction with the officials of the Forest Department, we have set an ambitious timeline of 12 months to develop a comprehensive “Forest Management” plan. This progressive initiative is driven by our… pic.twitter.com/F7XQEtyJqH
— VishwajitRane (@visrane) May 25, 2023
वनमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, या योजनेच्या अंतर्गत राज्यातील वनक्षेत्र भविष्यात सुरक्षित रहाणार आहे. यासाठी राज्यातील वन अधिकारी दुसर्या राज्यांना भेट देऊन तेथे वन व्यवस्थापन चांगल्या रितीने कसे केले जाते ?, याचा अभ्यास करणार आहेत. वन अधिकारी रानथंबोर (राजस्थान), ताडोबा (महाराष्ट्र), बंधर्वघर (मध्यप्रदेश) आणि जीम कार्बेट पार्क (उत्तराखंड) येथे भेटी देणार आहेत. विशेष करून मध्यप्रदेश येथील मॉडेलच्या आधारावर गोव्यात वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल सिद्ध केले जाणार आहे. गोव्यात भगवान महावीर अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, बोंडला अभयारण्य, मोले राष्ट्रीय उद्यान, डॉ. सलीम अली अभयारण्य, म्हादई वन्यजीव अभयारण्य आणि नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य मिळून ६ अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे.