सातारा येथे २८ मे या दिवशी, तर कोल्हापूर येथे २९ मे या दिवशी हिंदु एकता दिंडीचे आयोजन !
सातारा/कोल्हापूर – सातारा येथे २८ मे या दिवशी दुपारी ४ वाजता हिंदु एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी दुपारी ४ वाजता श्री शाहू कलामंदिर येथून प्रारंभ होईल. राजवाडा-मोती चौक-५०१ पाटी-देवी चौक-मोती चौक-राजवाडा-पंचपाळी हौद येथे दिंडीचा समारोप होईल.
कोल्हापूर येथे २९ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता मिरजकर तिकटी येथून हिंदु एकता दिंडीचा प्रारंभ होईल. मिरजकर तिकटी-खरी कॉर्नर-महाद्वार रोडमार्गे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दिंडीची सांगता होईल. तरी यात जिज्ञासूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.