सगुणातील सद्गुरु माऊली नंदकुमार जाधवकाका ।
सगुणातील गुरुमूर्ती तू सद्गुरु माऊली ।
आनंदमाचा सागर तू सद्गुरु माऊली ।। धृ. ।।
हात कटेवरी ठेवता तू विठ्ठल शोभे ।
कधी कधी आपले कृष्णरूप दिसे ।। १ ।।
सद्गुरु माऊली आश्रम हे तुझे गोकुळ असे ।
त्यातले साधक अन् साधिका गोप-गोपी भासे ।। २ ।।
प्रत्यक्ष वैकुुंठातले चैतन्य आम्हा मिळे ।
सगुणातील भगवंताचे दर्शन प्रतिदिन होत असे ।। ३ ।।
– कु. प्रियांका शिंदे, नाशिक (४.९.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |