सद्गुरु काका, साधना करतो आम्ही तुमच्या कृपेने ।
सद्गुरु काका, (टीप १) होते मी दगड ।
मिळाला सुंदर आकार, तुमच्या कृपेने ।। १ ।।
सारा प्रवास होता मायेच्या अंधारात ।
साधनेचा प्रकाश मिळाला, तुमच्या कृपेने ।। २ ।।
आम्हास करता मार्गदर्शन आनंदाने ।
साधना करतो आम्ही, तुमच्या कृपेने ।। ३ ।।
मनातील इच्छा पूर्ण होते ।
सद्गुरु काका, तुमच्या कृपेने ।। ४ ।।
प्रक्रिया (टीप २) करतांना आनंद घ्यायला शिकलो ।
सद्गुरु काका, तुमच्या कृपेने ।। ५ ।।
निर्मूलन करूनी स्वभावदोष आणि अहं यांचे ।
गुरुचरणी जाणे समजले, तुमच्या कृपेने ।। ६ ।।
टीप १ – सद्गुरु नंदकुमार जाधवकाका
टीप २ – स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया
– कु. प्रियांका शिंदे, गाजरवाडी, नाशिक. (३०.४.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |