मुंबई महापालिकेचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवरील बंदीचा निर्णय मान्य नाही ! – आमदार आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप
मुंबई – मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणार्या पीओपीच्या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणे अशास्त्रीय, असंविधानिक आणि अयोग्य ठरेल, अशी भूमिका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मांडली आहे.