जुलैमध्ये प्रदर्शित होणार ‘अजमेर ९२’ चित्रपट !

अजमेर दर्ग्याच्या सेवकांकडून २५० हून अधिक हिंदु तरुणींवर झालेल्या बलात्कारांच्या घटनांयर आधारित !

मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स आणि ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटांतून हिंदूंवरील धर्मांध अन् जिहादी आतंकवाद्यांचे अत्याचार जगासमोर आणल्यानंतर आता ‘अजमेर ९२’ हा चित्रपट येत्या जुलै मासामध्ये प्रदर्शित होणार आहे. राजस्थानमधील अजमेर येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या सत्यकथेवर हा चित्रपट आधारित आहे. अभिषेक दुधैया हे या चित्रपटाचे सहनिर्माते आणि दिग्दर्शक आहेत, तर ‘टिप्स’ आस्थापनाचे मालक कुमार तौरानी हे याचे निर्माते आहेत.

अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अन्य धर्मांध मुसलमान यांच्याकडून २५० हून अधिक महाविद्यालयीन हिंदु तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. यांतील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यावर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यांतील अनेकांना अटक करण्यात आली, तरी अनेक आरोपी अद्यापही पसार आहेत.