काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या मेहुण्याची ‘ईडी’द्वारे चौकशी !
आर्थिक अपव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली !
चंद्रपूर – सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली आहे. ‘ईडी’चे पथक या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी येथे येणार आहे.
भद्रावती आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात काकडे यांनी आर्थिक अपव्यवहार केल्याच्या तक्रारी प्रविष्ट आहेत, तसेच सक्तवसुली संचालनालयाकडेही काकडे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट आहे. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाचे उपसंचालक संजय बंगारतळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांना पत्र पाठवून गुन्ह्याविषयीचे दस्तऐवज आणि ‘ईडी’च्या पथकाला आवश्यक ते साहाय्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.