न कंटाळता पुनःपुन्हा सुधारणा सांगणारे अतुल्य गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले आणि तेवढ्याच संयमाने कपडा १०० हून अधिक वेळा उसवून पुन्हा शिवणारी त्यांची शिष्या सौ. पार्वती जर्नादन !
‘एक दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पुढील चौकट छापून आली होती – ‘गुरु शिष्याकडून कार्य करून घेत असतांना शिष्याची क्षमता वाढवतात. श्री रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांचे आत्मबळ वृद्धींगत करून त्यांच्याकडून कार्य करून घेतले.’ – प.पू. भक्तराज महाराज
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांची बंडी शिवतांना त्यात अनेक वेळा सुधारणा सांगणे आणि कागदावर खुणा करून आकारही काढून दाखवणे
वरील चौकट वाचल्यानंतर ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्याकडूनही अशाच प्रकारे बंडी शिवण्याची सेवा करवून घेतली’, असे मला वाटले. बंडी किंवा सदरा शिवण्याच्या संदर्भात माझा काहीच अभ्यास नव्हता, तरी परात्पर गुरुदेवांनी त्यांची बंडी आणि सदरा माझ्याकडून १०० पेक्षाही अधिक वेळा उसवून आणि पुन्हा शिवून त्याचा अभ्यास करवून घेतला. ‘परम पूज्यांनी कागदावर नव्याने खुणा करून त्यात आकार कसा असायला पाहिजे ?’, ते मला दाखवले. नंतर मी अल्प प्रतीच्या कापडावर गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे खुणा करून ते कापड कापून बंडी आणि सदरा शिवला.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी टप्प्याटप्प्याने शिकवून सात्त्विक बंडी आणि सदरा शिवून घेणे
या सेवा करतांना माझ्या समवेत सहसाधक नव्हते. त्यामुळे मला गुरुदेवांना अपेक्षित असे कापड मापाप्रमाणे कापण्याचा आत्मविश्वास नव्हता, तरीही गुरुदेवांनी माझ्याकडून टप्प्याटप्प्याने कापड मापात कापणे आणि शिवणे या सेवा करवून घेतल्या. तेव्हा शिवलेल्या २ बंड्या आणि १ सदरा दोन्ही गुरुदेवांना अपेक्षित असे शिवून झाले.’
– सौ. पार्वती जनार्दन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३३ वर्षे) (२१.५.२०२१)