‘लव्ह जिहाद’चे समर्थन करत असल्यावरून बजरंग दलाचा ‘द क्रिएटर : सृजनहार’ चित्रपटाला विरोध
कर्णावती (गुजरात) – बजरंग दलाकडून ‘द क्रिएटर : सृजनहार’ या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. येथील ज्या चित्रपटगृहामध्ये हा प्रदर्शित केला जाणार होता, त्या चित्रपटगृहाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. बजरंग दलाकडून आरोप करण्यात आला आहे की, या चित्रपटामध्ये लव्ह जिहादचे समर्थन करण्यात आले आहे.
१. या चित्रपटात ‘सीआयडी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते दयानंद शेट्टी मुख्य भूमिका साकारत आहेत. २६ मेपासून हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परवीन हिंगोनिया यांनी केले आहे, तर राजेश कराटे गुरुजी हे निर्माते आहेत. या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या तरुणांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. लोकांनी धर्म विसरून केवळ प्रेम करावे, असे यात दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
२. या चित्रपटाचे निर्माते राजेश कराटे गुरुजी म्हणाले की, मी सर्व धर्मियांना विनंती करतो की, त्यांनी धर्माच्या नावावरून दंगल किंवा हिंसा करू नये. तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी एखाद्या व्यक्तीला का मारता ? धर्माला मारा आणि माणुसकी जपा. (असे सांगण्यासाठी राजेश कराटे गुरुजी जिहादी आतंकवाद्यांविषयी, तसेच मुसलमान आणि ख्रिस्ती धर्म या जगात कसा पसरला आणि आजही कसा पसरत आहे ?, याविषयी चित्रपट का काढत नाहीत ? त्यातून ते ‘तुम्ही धर्माला मारा आणि माणुसकीला जपा’ असे का सांगत नाहीत ? – संपादक)
‘द क्रिएटर- सृजनहार’ पर बवाल, अहमदाबाद में बजरंग दल कार्यकर्ताओं का प्रदर्शन: फिल्म पर लव जिहाद को बढ़ावा देने का आरोप#TheCreator #thecreatorsarjanhar #BajarangDal https://t.co/3zudnpLcKM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 25, 2023
संपादकीय भूमिका
|