एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९८
‘बर्याच जणांना पिशवी (बॅग) किंवा पर्स एकाच खांद्यावर घेण्याची सवय असते. नेहमी एकाच खांद्यावर सातत्याने वजन घेतल्याने शरिराच्या संरचनेत पालट होतात आणि शरीर एका बाजूला कलते. चारचाकी गाडीच्या एखाद्या चाकात जर हवा न्यून असेल, तर गाडी नीट चालत नाही. त्याप्रमाणे शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |