ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्या सरकारी घराच्या फाटकाला चारचाकी वाहनाची धडक !
लंडन (इंग्लंड) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या ‘१०, डाऊनिंग स्ट्रीट’ येथील घराच्या मुख्य फाटकाला २५ मे या दिवशी एका चारचाकी वाहनाने धडक दिली. या घटनेच्या वेळी सुनक निवासस्थानी उपस्थित होते.
पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपी चालकाला अटक केली. आरोपीने हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे का ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुणी घायाळ झालेले नाही.