आग्रा येथे २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त
आग्रा (उत्तरप्रदेश) – आग्रा येथील स्टेट बँकेच्या शाखेत रोख जमा करण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाकडून २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बँक व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी व्यावसायिकाला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हर्षल नावाचा व्यावसायिक २ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. यामध्ये २ सहस्र रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या.
Man Arrested In Agra For Trying To Deposit Fake Rs 2,000 Notes In SBI Branch#news #trending https://t.co/1O0dXKr7yh
— Indiatimes (@indiatimes) May 25, 2023
बँकेचे व्यवस्थापक अशोक कर्दम यांनी रकाबगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप कुमार यांना ही माहिती दिली. पोलिसांनी बँकेत धाव घेऊन व्यावसायिकाला कह्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.