मला स्वच्छेने सनातन धर्म स्वीकारायचा आहे ! – बांगलादेशातून आलेली मुसलमान तरुणी
बांगलादेशातून आलेल्या मुसलमान तरुणीची धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथावाचनाच्या वेळी विनंती !
बालाघाट (मध्यप्रदेश) – येथील परसवाडा भागात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या रामकथा वाचनाच्या वेळी बांगलादेशी मुसलमान तरुणीने तिचे विचार मांडले. शास्त्री यांनी तिला व्यासपिठावर बोलावले होते. ती म्हणाला की, भगवान राम यांचे नाव घेतल्याने मनःशांती मिळते. ‘यू ट्यूब’वर हिंदु धर्माचे भजन, कीर्तन, धार्मिक कथा आणि तुमची (धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे) रामकथा पहाते. आता मला सनातन धर्म स्वीकारायचा आहे. सनातन धर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही.
Bangladeshi Muslim woman meets Bageshwar Dham Sarkar, says she finds peace in Lord Rama’s name, wants to embrace Sanatan Dharma
https://t.co/f4Yjasv5Ue— OpIndia.com (@OpIndia_com) May 25, 2023
धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या तरुणीला विचारले, ‘तू कुणाच्या दबावामुळे असे म्हणत आहेस का ?’, यावर ती म्हणाली, ‘मी स्वच्छेने व्हिसा घेऊन भारतात आले असून माझ्यावर कुणाचाही दबाव नाही.’ यावर शास्त्री यांनी सांगितले, ‘आता तू तुझ्या धर्मातच रहा. आमच्यावर उपद्रव निर्माण करण्याचा आरोप केला जातो; मात्र मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आणि धर्मांतरावर माझा विश्वास नाही. श्रीरामनामावर आणि धर्मात पुनर्प्रवेश करण्यावर माझा विश्वास आहे.