भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सज्ज व्हा ! – धीरेंद्र कृष्णशास्त्री
कर्णावती (गुजरात) – बागेश्वर धामचे स्वामी धीरेंद्र कृष्णशास्त्री १० दिवसीय गुजरात दौर्यावर आले आहेत. ते कर्णावती येथे पोचले. कर्णावतीमधील वटवा येथे देवकीनंदन महाराजांच्या शिवपुराण कथेत त्यांनी भाग घेतला. या वेळी मार्गदर्शन करतांना धीरेंद्र कृष्णशास्त्री म्हणाले की, सनातन धर्मासाठी जागे होण्याची वेळ आली आहे. सनातन धर्माचा अवमान करणार्यांना क्षमा करता येणार नाही. भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सज्ज व्हा. सनातन धर्म मानणार्यांनी संघटित व्हावे. त्यांनी सनातनसाठी जागे व्हावे, अन्यथा पुढच्या पिढ्यांमध्ये रामकथेचे वाचन होऊ शकणार नाही.
२९ मे २०२३ या दिवशी कर्णावती येथे ‘दिव्य दरबार’ आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये मी सनातन धर्माच्या बाजूने बोलणार आहे, असे धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीरामाचा राज्याभिषेक झाला, आता श्रीकृष्णाचा राज्याभिषेक होणार आहे. ‘मी घाबरत नाही; कारण सीताराम आणि हनुमान वर आहेत.’’
सौजन्य रिपब्लिक भारत