अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २८ मे या दिवशी रक्तदान शिबिर !
सांगली, २५ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शासकीय रुग्णालयाशेजारी ‘शिरगावकर ब्लड बँक’ येथे होत आहे. तरी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.