देवाची ओढ असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा जामनगर (गुजरात) येथील कु. ओजस लिमकर (वय ९ वर्षे) !

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. ओजस लिमकर हा या पिढीतील एक आहे !

कु. ओजस लिमकर

(‘वर्ष २०१५ मध्ये कु. ओजस याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि आता वर्ष २०२३ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

१. वय १ ते २ वर्षे

१ अ. देवाची ओढ : ‘कु. ओजस प.पू. भक्तराज महाराज यांची (प.पू. बाबांची) भजने एकाग्रतेने ऐकायचा. तो देवाला स्वतःहून नमस्कार करायचा. त्याला जयघोष करायला आवडायचे.

२. वय २ ते ३ वर्षे

सौ. संगीता लिमकर

२ अ. तो त्याची खेळणी काळजीपूर्वक हाताळायचा आणि एकाग्रतेने खेळायचा.

२ आ. तो शाळेत शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास घरी सर्वांना म्हणून दाखवायचा.

२ इ. त्याला सर्व वयोगटांतील मुलांमध्ये मिसळून खेळायला आवडते. तो मित्रांसाठी डब्यात अधिक खाऊ न्यायचा.

२ ई. देवाची आवड : तो सायंकाळी देवघरात दिवा लावल्यावर नमस्कार करून ‘शुभं करोती’ म्हणत असे. तो मंदिरात गेल्यावरही शांत आणि एकाग्रतेने बसायचा.

३. वय ३ ते ४ वर्षे

३ अ. प्राणीमात्रांवर प्रेम करणे : आम्ही राजस्थान येथील सुरतगड येथे रहात असतांना आमच्या घराच्या उद्यानात मोर आणि अन्य प्राणी अन् पक्षी यायचे. तो त्यांच्यासाठी उद्यानात खाऊ आणि पाणी आवडीने ठेवायचा.

३ आ. त्याला झाडांना पाणी घालायला आणि त्यांची काळजी घ्यायला आवडत असे.

३ इ. शालेय स्पर्धेत पारितोषिके मिळवणे : ओजसला शाळेतील ‘गाणे म्हणणे, विविध प्रकारच्या वेशभूषा करणे, वक्तृत्व स्पर्धा’, अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा उत्साह असायचा. त्याने प्रत्येक वर्षी अनेक पारितोषिके मिळवली आहेत.

४. वय ४ ते ५ वर्षे

४ अ. कुशाग्र बुद्धीमत्ता

१. त्याच्याशी बोलतांना त्याची प्रगल्भ उत्तरे ऐकून मला पुष्कळ कौतुक वाटे.

२. मी मुलाकडे असतांना बगलामुखीदेवीचे स्तोत्र दिवसातून ३ वेळा ऐकत होते. त्या वेळी त्या स्तोत्रातील काही वाक्ये ओजसने स्वतःहून मुखोद्गत करून मला म्हणून दाखवली.

४ आ. साधनेची आवड

१. कोरोना महामारीच्या काळात आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी साधकांना श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव यांचा नामजप करायला सांगितला होता. एकदा मी त्याला हा नामजप करून दाखवला. त्या वेळी त्याने मला ‘नामजप करतांना न्यास किंवा मुद्रा कशी करायची ?’, हे विचारले. त्याने मला सांगितले, ‘‘मी नामजपाला कशी बसते ?’, याचे छायाचित्र पाठव.’’ तेव्हा मला त्याचे पुष्कळ कौतुक वाटले.

२. त्याला श्रीकृष्णाचा नामजप, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करायला पुष्कळ आवडते. तो मलाही या सर्वांची आठवण करून देतो.

५. स्वभावदोष

शाळेचा अभ्यास करण्याचा आळस करणे आणि हट्टीपणा’

– सौ. संगीता लिमकर (कु. ओजस याची आजी), सांगली (२६.१२.२०२२)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.