कल्याण रेल्वेस्थानक परिसरातून १७ भिकारी, १४ गर्दुल्ले यांना अटक
ठाणे, २५ मे (वार्ता.) – कल्याण रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्या प्रवाशांना गर्दुल्ल्यांनी लुटले, तसेच महिलांची छेड काढलील, अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद घेत २३ मेच्या रात्री १७ भिकारी, १४ गर्दुल्ले अशा ३१ जणांना लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कारवाई करून रेल्वेस्थानक भागातून अटक केली आहे. २ दिवसांपूर्वी कल्याण रेल्वेस्थानकातून सकाळच्या वेळेत कामावर चाललेल्या महिलेला गर्दुल्ल्याने मिठी मारून तिचा विनयभंग केला होता. या घटनेचा निषेध करत प्रवासी संतप्त आहेत. याच्या निषेधार्थ येथे आंदोलनही करण्यात आले होते. यानंतर ही कारवाई करण्यात आली. ‘अशीच कारवाई जिल्ह्यातील अन्य रेल्वेस्थानकांच्या परिसरातही करावी’, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांना हे गद्दुल्ले सर्वत्र दिसत असतांना ते त्यांच्यावर स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? |