पन्हाळा गडावरील (जिल्हा कोल्हापूर) मजारीची अज्ञातांकडून नासधूस !
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या तानपीर मजारीची २५ मे या दिवशी पहाटे अज्ञातांनी नासधूस केली. नासधूस केल्यानंतर काही काळ पन्हाळा बंद ठेवण्यात आले होते. येथील वातावरण तणावग्रस्त होऊ नये; म्हणून पन्हाळा गडावर सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि गडावर जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या मजारीची काही वेळानंतर परत डागडुजी करण्यात आली. या मजारीविषयी प्रसारमाध्यमांवर ८ दिवसांपासून काही संदेश प्रसारित होत आहेत.
या संदर्भात पन्हाळा पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘वातावरण निवळल्यानंतर सर्वांना प्रवेश देण्यात येईल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’, असे आवाहन केले आहे.