पशूवधगृह बंद करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचे निवेदन घेऊन आलेले वृद्ध उपमुख्यमंत्र्यांसमोर कोसळले !
सोलापूर – येथे दौर्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी एक ९६ वर्षांचे वृद्ध गृहस्थ आले. त्यांना निवेदन देत असतांनाच ते भोवळ येऊन खाली कोसळले. पशूवधगृह बंद करण्यासाठी ते अनेक वर्षे लढा देत आहेत. या संदर्भातील निवेदन त्यांनी या वेळी उपमुख्यमंत्र्यांना दिले. पशूवधगृह बंद करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली; मात्र त्याची आतापर्यंत कुणीही नोंद घेतली नाही.
महसूल भवनाचे लोकार्पण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सोलापूर येथे गेले होते. फडणवीस यांनी वृद्धाची विचारपूस करून पाणी मागवले, तसेच गर्दी अल्प केली.
२० मैलांच्या परिसरात पशूवधगृह नसावे. त्याच्या वासामुळे पक्षी, घारी वगैरे येतात, अशा अनेक तक्रारी आहेत. सर्व अधिकार्यांची चौकशी करावी. हे पशूवधगृह बंद झाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचेही वृद्धाने सांगितले.
संपादकीय भूमिका
|