‘महावितरण’च्या पुणे परिमंडळामध्ये वर्षभरात २५ कोटी रुपयांची वीजचोरी !
८ कोटी ९६ लाख रुपयांची वसुली; २८ जणांविरोधात फौजदारी गुन्हे
पुणे – ‘महावितरण’च्या पुणे परिमंडळामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ४ सहस्र ६७८ ठिकाणी अनुमाने २४ कोटी ७९ लाख रुपयांची वीजचोरी आणि विजेचा अनधिकृत वापर झाला आहे. त्या अंतर्गत १ सहस्र ४७५ प्रकरणांमध्ये ८ कोटी ९६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तर २८ जणांविरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची वीजचोरी होईपर्यंत परिमंडळ काय करत होते ? चोरी केलेल्यांकडून रक्कम वसूल करण्यासमवेत संबंधित अधिकार्यांना शिक्षा म्हणून त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करावी, असेच जनतेला वाटते ! |