महाराष्ट्राचा इयत्ता १२ वीचा निकाल ९१.२५ टक्के, कोकणाचा निकाल सर्वाधिक !
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल २५ मे या दिवशी घोषित करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला असून राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९६.१ टक्के इतका लागला आहे.
सौजन्य : ABP MAJHA
१. परीक्षेला एकूण १४ लाख १६ सहस्र ३७१ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १२ लाख ९२ सहस्र ४६८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
२. पुणे विभागाचा निकाल ९३.३४, कोल्हापूर ९३.२८, अमरावती ९२.७५, औरंगाबाद ९१.८५, नाशिक ९१.६६, लातूर ९०.३७, नागपूर ९०.३५, तर मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला आहे.
३. राज्यात मुलींचा निकाल ९३.७३ टक्के, तर मुलांचा निकाल ८९.१४ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना ५ जून या दिवशी आपापल्या महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे.