लष्कराची लेखी परीक्षा देणार्या तोतया उमेदवारांना अटक !
पुणे – आळंदी रस्त्यावर लष्कराची रस्ते विकास बांधणी संस्था (ग्रेफ) आहे. या संस्थेकडून सीमेवर असलेल्या दुर्गम भागात रस्तेबांधणीचे काम केले जाते. या संस्थेतील भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेत आरोपी रामपति दयाल याने परमजीत सिंह याला तोतया उमेदवार म्हणून बसवले होते, तसेच सोनू सुरेश याने त्याच्या साथीदाराला तोतया उमेदवार म्हणून बसवले होते. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पर्यवेक्षक अरुण कुमार एस्.व्ही. यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संपादकीय भूमिकामेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! अशा प्रकारे उत्तीर्ण होण्याचा मार्ग अवलंबणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! |