आज-काल विरोधाची परंपरा निर्माण झाली आहे ! – राहुल सोलापूरकर, अभिनेते
पुण्याच्या एफ्.टी.आय.आय.मध्ये ‘द केरल स्टोरी’ला विद्यार्थ्यांचा विरोध
पुणे – आज-काल विरोधाची परंपरा निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा, असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले. येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (एफ्.टी.आय.आय.) २० मे या दिवशी ‘द केरळ स्टोरी’चा खेळ आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शवत चित्रपटाला विरोध केला होता. (सत्य घटनेवर आधारित चित्रपटाला विरोध करणारे हे विद्यार्थी चित्रपटक्षेत्रात उद्या कार्यरत असतील, तर ते असे चित्रपट नव्हे, तर काल्पनिक आणि हिंदुविरोधीच चित्रपट बनवतील. त्यामुळे विरोध करणार्या विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांची पार्श्वभूमी पडताळून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक) या पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले. सकाळी ९ वाजता चित्रपट चालू होतांना दोन्ही गटांकडून घोषणा देण्यात आल्या. ‘स्क्रिनिंग’च्या आधी त्या गटाने एफ्.टी.आय.आय.च्या परिसरात मोठे आंदोलनही पुकारले होते; पण विद्यार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे ‘स्क्रीनिंग’ चालू ठेवण्यात आले. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील कलाकार, तसेच शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रांतील कलाकार उपस्थित रहाणार असल्याने पोलीस तैनात केले होते. पोलीस बंदोबस्तात खेळ पार पडला.