बंगालमध्ये ३४ सहस्र किलो स्फोटकांचा साठा जप्त !
|
कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांनी राज्यात विविध ठिकाणी धाडी घालून ३४ सहस्र किलो स्फोटकांचा साठा आणि अवैध फटाके जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणी १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण १३२ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी या धाडीनंतर फटाक्यांवरही बंदी घातली आहे. पोलिसांनी घातलेल्या धाडींच्या ठिकाणी अवैधरित्या फटाके बनवले जात होते. त्यासाठी स्फोटके वापरण्यात येत होती. गेल्या ८ दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या बनवण्यात येणार्या फटाक्यांच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या स्फोटांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.
34,000 Kg Of Explosives Seized In Bengal, 100 People Arrested: Cops https://t.co/pl3lZFopPO #Bengalblasts #Bengalpolice #explosivesseizedinbengal #SouthParganas
— Akhand Bharat Tv (@abt_live) May 25, 2023
संपादकीय भूमिका
|