कलियुगात वाईट लोकांच्या पापांचा घडा भरेल, तेव्हा महादेवाला पृथ्वीवर यावे लागेल ! – क्रांती वानखेडे
आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणी क्रांती वानखेडे यांचे वक्तव्य !
मुंबई – माझी आजी म्हणायची हे कलियुग आहे. यामध्ये खोटे, धोका, दिखावा, छळ, कपट आहे. येथे चांगुलपणाला लोक टिकू देत नाहीत. जे लोक खरे काम करतात, त्यांना दाबणार्यांची संख्या अधिक आहे; पण चांगले आणि खरे काम करणार्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडले जाईल, तेव्हा पापाचा घडा भरेल. ज्या दिवशी वाईट लोकांच्या पापांचा घडा भरेल, तेव्हा महादेवाला स्वत: या पृथ्वीवर यावे लागेल आणि ते प्रलय करतील, असे वक्तव्य सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने चौकशी चालू असलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एन्.सी.बी.चे) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी केले.
मे अच्छाई के साथ चल रही हू! पती समीर वानखेडे सध्या आर्यन खान प्रकरणात अडचणीत असताना क्रांती रेडकर हिने पोस्ट केला सूचक व्हिडिओ.. पाहा काय म्हणते अभिनेत्री
.
.
.#sameerwankhede #krantiredkar #krantiredkarwankhede #NCBzonalofficer #Ncbofficer #aryankhan #shahrukhkhan pic.twitter.com/mbVzcEGIRN— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2023
अमली पदार्थ प्रकरणी अभिनेते शहारूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. वरील वक्तव्याचा एक व्हिडीओ प्रसारित करत क्रांती यांनी त्यांचा पती अडचणीत असल्याचे म्हटले आहे.