हिंदू काँग्रेसला मते देतात यापेक्षा दुर्दैव ते काय ? – अभिनेते शरद पोंक्षे
टिपू सुलतानच्या थडग्याचे दर्शन घेणार्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र प्रसारित करून हिंदुत्वनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा प्रश्न !
मुंबई – हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतानच्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस पक्ष उघडपणे इतके सगळे करत असतांनाही जेव्हा हिंदू लोक यांना मते देतात, त्यापेक्षा दुर्दैव काय असू शकते ?, असा प्रश्न प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. यावर अनेकांनी अभिप्राय दिले आहेत.
नुकत्याच कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. २० मे या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शपथ घेतली, त्या वेळी अभिनेते पोंक्षे यांनी वरील छायाचित्र प्रसारित केले होते.
*हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतान च्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले…. कोंग्रेस पार्टी उघडपणे इतकं सगळं करत असताना देखील जेव्हा हिंदू लोक यांना मत देतात हयाच्याएवढं दूर्दैव काय? pic.twitter.com/JzBt5JTTyJ
— SHARAD PONKSHE (@ponkshes) May 25, 2023