(म्हणे) ‘हिजाब बंदी, गोहत्या बंदी हटवा !’ – अॅम्नेस्टी इंडिया
हिंदुद्वेषी ‘अॅम्नेस्टी इंडिया’ची कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे मागणी !
नवी देहली – भारत आणि हिंदुविरोधी मानवाधिकार संघटना ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ची भारतीय शाखा ‘अॅम्नेस्टी इंडिया’कडून कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारसाठी हिंदुविरोधी मागण्यांची एक सूची जारी केली आहे. यामध्ये राज्यात शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाबवरील बंदी हटवणे, गोहत्यांना अनुमती देणे आणि मंदिरांजवळील मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याच्या विरोधात कारवाई करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात काही ट्वीट्स करत या मागण्या या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
सौजन्य इंडिया टूडे
१. ‘अॅम्नेस्टी इंडिया’ने म्हटले आहे की, हिजाबवरील बंदी ही मुसलमान मुलींचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार यांमध्ये पर्याय निवडण्यास बाध्य करते. यामुळे या मुलींचे समाजामध्ये सहभागी होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
२. ‘अॅम्नेस्टी इंडिया’ने राज्यातील गोहत्या बंदी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करण्यासह त्यांना रहित करण्याची मागणी केली आहे. गोहत्या बंदी आणि धर्मांतर बंदी यांच्याविषयी बनवलेल्या कायद्यांचा दुरुपयोग होऊ शकतो. याचा वापर अल्पसंख्यांकांच्या विरोधात हत्यारासारखा होऊ शकतो, असे म्हटले आहे.
३. मुसलमान दुकानदारांवरील बहिष्काराविषयी ‘अॅम्नेस्टी इंडिया’ने म्हटले की, राज्यातील निवडणुकीच्या पूर्वी मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार आणि हिंसाचार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. धर्म, जाती यांवर आधारित भेदभाव आणि गुन्हे थांबवण्यासाठी प्रयत्न करावा.
Amnesty officially asks Karnataka Govt to:
1. Remove Hijab ban
2. Legalize Cow slaughter
3. Enact revenge on Hindus who boycott Muslim shops.
The 1st curbs women’s rights, 2nd promotes animal cruelty and 3rd is demanding payback on common citizens. Yes, Amnesty is a Humanist… https://t.co/2LLaSczpop
— Cogito (@cogitoiam) May 24, 2023
लवकरच योग्य निर्णय घेतले जातील ! – काँग्रेस
अॅम्नेस्टी इंडियाच्या या मागण्यांवर कर्नाटकमधील विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड म्हणाले की, सरकारने काही दिवसांपूर्वीच कामकाज हातात घेतले आहे. मला आशा आहे की, याविषयी लवकरच योग्य निर्णय घेतले जातील.
संपादकीय भूमिका
|