कराड प्रांत कार्यालयात लाच घेतांना दोघांना रंगेहात पकडले !
तळागाळातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
कराड, २४ मे (वार्ता.) – येथील प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागातील दोघांना प्रत्येकी १० सहस्र रुपये अशी २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. कराड येथील ९ शेतकर्यांकडून भूसंपादनाच्या प्रक्रियेत पाठपुरावा प्रतिज्ञापत्र घेतलेले होते. प्रतिज्ञापत्रातील मूल्यांकन प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी तक्रारदार उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेल्यावर भूसंपादन शाखेतील लिपिक रामचंद्र श्रीरंग पाटील आणि दिनकर रामचंद्र ठोंबरे यांनी लाच मागितली होती.