उत्तरप्रदेशातील बरेली येथे मंदिरात घुसून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड !
बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील बरेली येथे समाजकंटकांनी मंदिरात घुसून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. घुसखोरांनी मूर्तीच्या हाताची बोटे आणि चक्र तोडले. मूर्तीचा मुकूटही काढून जमिनीवर फेकला. हिंदु संघटनांनी घटनास्थळी धाव घेऊन मूर्तीची विटंबना करणार्यांचा निषेध केला. मंदिरातील पुजार्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
१. ही घटना बरेलीतील रिठोरा गावात २३ मे २०२३ या दिवशी घडली. मंदिराचे पुजारी निर्माण सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी सकाळी पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड झाल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच मंदिरात लावलेला ध्वजही उपटून फेकून दिल्याचे मला आढळले.
२. श्री. सिंह यांनी स्थानिकांच्या साहाय्याने हाफिजगंज पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. स्थानिकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
३. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|