भगवान परशुराम यांनी केलेले महान कार्य
भगवान परशुरामांनी जी राजनीती अवगत केली होती. त्या राजनीतीचा उपयोग त्यांनी समाजाला वळण लावण्यासाठी केला. त्यांनी प्राप्त केलेल्या धनुर्विद्येचा उपयोग अन्याय नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला. स्वपराक्रमावर पृथ्वीचे ऐश्वर्य संपादन करून ते कश्यप मुनींच्या चरणी अर्पण केले. वैदिक संस्कृतीची प्रस्थापना करण्यासाठी अवधूत दत्तात्रयांकडून श्रीविद्येचे सुलभिकरण करवून घेतले; म्हणूनच विविध क्षेत्रात कार्य करून मानवाच्या कल्याणासाठी ब्रह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने तळपणार्या परशुरामांचा राजराजेश्वर म्हणून गौरव करण्यात येतो.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली.