भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध !
कोल्हापूर – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करतांनाचा एका ‘व्हिडिओ’ काँग्रेस पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावरून प्रसारित झाला आहे. तरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय खाडे-पाटील म्हणाले, ‘‘या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि ‘भारत-जोडो यात्रे’ची तुलना हिंदवी स्वराज्य निर्मितीशी करत असल्याचे भासवण्यात आले आहे. हे अतिशय निंदनीय आहे. ज्या काँग्रेसने कधीच भारताच्या थोर राष्ट्रपुरुषांचा सन्मान केला नाही, ते केवळ मतांची गोळा-बेरीज डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीपूर्वी शिवप्रेमाचा बेडगी आभास निर्माण करू पहात आहेत. हे जागृत शिवप्रेमी कधीही सहन करणार नाहीत आणि या व्हिडिओची तात्काळ प्रसिद्धी थांबवून याविषयी राहुल गांधींनी जनतेची जाहीर क्षमायाचना करावी.’’