श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी शरणागतभावाने झुकलेली रथोत्सवाच्या मार्गावरील झाडे !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या मार्गावरील झाडे झुकलेली दिसणे आणि ‘ही झाडे परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाची वाट पहात आहेत’, असे वाटणे
‘२२.५.२०२२ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी रथात विराजमान झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन घेण्यासाठी मी रामनाथी आश्रमातील आगाशीत उभी होते. आम्ही जेथे उभे होतो, तिथे रथाचे आगमन होण्यास थोडा वेळ होता. तेव्हा माझे लक्ष मार्गावरील झाडांकडे गेले. तेथील सर्व झाडे पुष्कळ झुकलेली दिसली. त्यांना पाहून ‘ही झाडे गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) दर्शनाची वाट पहात आहेत’, असे मला वाटले; पण ‘झाडे केव्हाही झुकलेलीच असतात’, असा विचार करून मी पुन्हा गुरुदेवांच्या दर्शनाची वाट पाहू लागले.
२. ‘श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या चरणांवर डोके टेकवण्यासाठी शरणागतभावाने झाडे झुकली आहेत’, असा विचार मनात येऊन भाव जागृत होणे
त्या स्थितीत असलेली झाडे नंतरही माझ्या डोळ्यांसमाेरच होती आणि मी पुन्हा बुद्धीने तसाच विचार करत होते. तेव्हा देवाने मला पुढील विचार दिले, ‘इतर वेळी झाडे झुकलेली असतात; परंतु त्या दिवशी झाडांच्या झुकण्याची स्थिती वेगळीच होती. ती झाडे श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या चरणांवर डोके टेकवण्यासाठी शरणागतभावाने झुकली होती. देवाला वाकून नमस्कार केल्याप्रमाणे ती झाडे दिसत होती.’ देवाने माझ्या मनात वरील विचार देऊन मला माझ्या अयोग्य विचारांची जाणीव करून दिली. त्या वेळी माझा भाव जागृत झाला.
‘हे गुरुदेवा, ही झाडे तुमच्या चरणदर्शनाची आतुरतेने वाट पहात होती. त्या वेळी ‘मी किती न्यून पडते !’, याची मला जाणीव झाली. ‘देव अनुभूती देतो; परंतु ती अनुभवण्यास बुद्धी आड येते’, हे माझ्या लक्षात आले. ‘हे गुरुदेवा, ‘आपण मला ही अनुभूती देऊन त्यातून पुष्कळ काही शिकवले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |