तीव्र उन्हामुळे येणार्या थकव्यावर सरबत उपयुक्त
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १९६
‘उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पुष्कळ घाम येतो. शरिरातील पाणी आणि क्षार न्यून झाल्याने थकवा येतो. अशा वेळी लिंबू सरबत किंवा अन्य कोणतेही सरबत प्यावे. याने पाणी आणि क्षार यांची पूर्तता होऊन लगेच तरतरी येऊन आराम वाटतो. सरबत उपलब्ध नसेल, तर पाणी प्यावे. त्यानेही लाभ होतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |