धर्मांधाने मुंबईतून आझमगड येथे अल्पवयीन मुलीला पळवून नेले !

  • मुंबईतील ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून उघड !

  • मुलीने वडिलांना संपर्क केल्यामुळे तिची सुखरूप सुटका

मुंबई – भांडुप येथून एका अल्पवयीन मुलीला आझमगढ येथे सैफ खान (वय १९ वर्षे) याने पळवून नेले होते. तिने तिच्या वडिलांना संपर्क केला. त्यामुळे तिचा ठावठिकाणा समजला. त्यामुळे पोलिसांच्या साहाय्याने मुलीची तेथून सुटका करण्यात आली. आझमगड येथे धर्मांधाने तिला एका खोलीत कोंडून ठेवले होते. तेथून मुलीने वडिलांना संपर्क करून सांगितले, ‘‘पोलीस तक्रार रहित करा. माझा विवाह झाला आहे. बाबा, मला विसरून जा.’’ हे तिने सैफ, त्याचे वडील, त्याचा भाऊ आणि त्याचे कुटुंब यांच्या सांगण्यावरून केले होते, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण मुंबईचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण यांच्याकडे देण्यात आले आहे.

‘हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे आहे. ‘या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी मी करत आहे. ‘भांडुप पोलिसांनी प्रारंभी या प्रकरणाकडे विशेष गांभीर्याने का पाहिले नाही ?’, असा प्रश्न मला पडला आहे. ‘मी या सगळ्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे’, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे यावर काही बोलतील का ?