उरूस निघाल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही ! – नितेश राणे, आमदार, भाजप
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती !
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – उरूस निघाल्यानंतर (उरूस म्हणजे मुसलमानांची धार्मिक मिरवणूक) त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे धूप दाखवण्याची परंपरा आहे, असे सातत्याने बोलले जाते; परंतु हे पूर्णतः खोटे आहे. आम्ही या संदर्भात ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्याशी बोललो. अशा कोणतीही पद्धतीची परंपरा नाही, असे प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी २३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
१. त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून बळजोरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना १३ मेच्या रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्या इच्छेनुसार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेतले आणि सहस्रो हिंदु बांधवांच्या उपस्थितीत महाआरती केली. त्यानंतर ते बोलत होते.
Nitesh Rane | उरुस निघाल्यावर त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची पद्धत नाही :नितेश राणे#nashik #niteshrane #trimbakeshwartemple pic.twitter.com/SJrz4M91WP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2023
२. तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते, त्र्यंंबकेश्वर येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने आमदार नितेश राणे यांचा सत्कार केला.
३. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना नितेश राणे म्हणाले की, या भागातील शांतता भंग करणे, हा आमचा हेतू नाही; पण १३ मे या दिवशी घडलेल्या घटनेसंदर्भात सातत्याने जे अपसमज पसरवले जात आहेत, हिंदूंची अपर्कीती केली जात आहे, त्या सर्व गोष्टींविषयी गावकरी आणि विश्वस्त यांच्या इच्छेनुसार आम्ही भेट देण्यासाठी येथे आलो आहोत. उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. जिहादी विचारांचे युवक या मंदिरात आले. त्यांनी फेसबूक लाईव्ह केले.
४. ते म्हणाले की, मंदिर बंद असतांना मंदिरामध्ये शिरण्याचा हट्ट करण्यात आला. तुम्हाला (मुसलमानांना) पूजा-अर्चा करायची आहे, तर सगळे जसे येतात, तसे आतमध्ये या. आरतीचे सामान घ्या. पूजेचे सामान घ्या. रांगेत उभे रहा, आतमध्ये या. सगळे जसे दर्शन घेतात, हिंदु धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कुणाचाही आक्षेप नाही.