उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ४२९ अवैध मजारी उद्ध्वस्त !
४५५ हेक्टर भूमी अतिक्रमणमुक्त !
(मजारी म्हणजे मुसलमान फकिरांची थडगी)
डेहराडून (उत्तराखंड) – गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील अवैध मजारींवर प्रशासनाकडून कारवाई चालू आहे. आतापर्यंत ४२९ मजारी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत; मात्र त्याच वेळी ४२ अवैध मंदिरे आणि २ गुरुद्वारेही पाडण्यात आली आहेत. आतापर्यंत ४५५ हेक्टर भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील सरकारी भूमींवरील सर्व अतिक्रमणे लवकराच लवकर हटवण्याचा आदेश अधिकार्यांना दिला आहे. तसेच या भूमींवर राज्यातील आणि राज्याबाहेरील किती जणांनी अवैध नियंत्रण ठेवले आहे, याची आकडेवारी देण्याचाही आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिकाअवैध मजारी बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते ? याला उत्तरदायी अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! |