माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिंदुजा रुग्णालयात भरती !
मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. २२ मेच्या रात्री प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी २३ मे या दिवशी रुग्णालयात जाऊन मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
🕛 माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.#Maharashtra #former #chiefminister #Manoharjoshi #Health #spoiled #HindujaHospital #admit #UBTPresident#UddhavThackeray #shivsenaubt pic.twitter.com/WzCUNoDj3D
— RNO | Right News Online मराठी (@RNO_OfficialM) May 23, 2023